नवी दिल्ली : दोन्ही नेत्यांनी कोविड -१९ च्या साथीने उद्भवणाऱ्या प्रादेशिक परिस्थितीविषयी चर्चा केली आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या देशांत काय पाऊले उचलली जात आहेत याविषयी एकमेकांना माहिती दिली. सार्क सदस्य देशांच्या नेत्यांमध्ये 15 मार्च रोजी झालेल्या विशेष व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. सार्क कोविड -१९ आपत्कालीन निधीमध्ये 1.5 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान शेख हसीना यांचे आभार मानले.
कोविड -१९ या प्रदेशात लढण्यासाठी आणि वैद्यकीय पुरवठा व क्षमता वाढवणे या दृष्टीने बांगलादेशला मदत पुरविण्याच्या समन्वित प्रयत्नांचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
रस्ता, रेल्वे, अंतर्देशीय जलमार्ग आणि वायूमार्गे सीमेवरील जीवनावश्यक वस्तूंचा सातत्याने पुरवठा केल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. इतिहास, संस्कृती, भाषा आणि बंधुता यांच्या सामायिक संबंधांची आठवण ठेवून पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या उत्कृष्ट स्थितीबद्दल आणि कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि या साथीच्या आरोग्यावरील आणि आर्थिक दुष्परिणामांना कमी करण्यासंबंधी समाधान व्यक्त केले. तसेच बांगलादेशला मदत करण्याची भारताची तयारी असल्याची हमी दिली.