नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोहिंग्यांवर म्यानमार सरकारनं केलेल्या हत्याकांडा विरोधात न्यायालयीन प्रकरण सुरु करावं का,या  बाबत संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार आहे.  संभाव्य हिंसा रोखण्यासाठी म्यानमारवर आणीबाणी लादण्यासंदर्भात देखील आज निर्णय होऊ शकतो.

संरक्षण दलानं रोहिंग्यां विरोधात कोणत्याही प्रकारचं हत्याकांड केलं नसल्याचा अहवाल म्यानमार सरकारनं नुकताच प्रसिद्ध केला होता. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या संभाव्य निर्णयावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बांग्लादेशमध्ये पळून गेलेल्या ७ लाख ४० हजार रोहिंग्यांमुळे बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा आणि अत्याचारांचं प्रमाण वाढलं आहे, म्हणून गांबिया या आफ्रिकी देशानं  इस्लामिक सहकारी संघटनेच्या  ५७ देशांच्या सहकार्यानं म्यानमार  विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ न्यायालयात प्रकरण दाखल केलं होतं.मात्र म्यानमारच्या नेत्या ऑंग सॅन सू की यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.