पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मोठा घोटाळा प्रकरण                                         तातडीने अटक करण्याची तक्रारदारांची मागणी
पिंपरी : निगडी प्राधिकरणातील टेल्के कपूर हौसिग सोसायटीतील जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या जमिनीची विक्री करून अनेक नागरिकांची फसवणूक केली. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्या प्रकरणी संबधित बांधकाम व्यायसायिक बी. के. जैन याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याने या प्रकरणात सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणी बी. कै. जैन याला तातडीने अटक करावी, अशी मागणी  तक्रारदारांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
टेल्को कपूर हौसिक सोसायटीची खोटी कागदपत्रे तयार करून कागदपत्रात  घोटाळा करून अनके कुटूंबाची फसवणूक या व्यक्तीने केलेली आहे. या प्रकरणी निगडी पोलिस स्टेशन येथे आरोपी बी.के.जैन याचे विरूद्ध भा.दं.वि.संहिता चे कलम 406,420,467,468,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  गुन्ह्याची व्याप्ती पहाता सदर तपास पोलिसआयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तसेच, पुणे येथे सि. टी.एस.17 फायनल प्लॉट नं.246,20 बंडगार्डन रोड या मिळकतीसंबधी खोटी कागदपत्रे तयार करून अशाचप्रकारे जमीन लाटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये भा.दं. वि.संहिता चे कलम 420,461,380 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हाबाबात आरोपी बी.के.जैन याने अटक पूर्व जामीनीसाठी अर्ज केल्यानंतर आरोपीचे सर्व म्हणणे मे. कोर्टाने फेटाळून लावले. तसेच, तयार केलेली सर्व खोटी व बोगस कागदपत्रे व ओरीजनल कागदपत्रे हजर करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपी यांना पोलिसांना कस्टोडीयल इंटरोगेशन साठी सुद्धा परवानगी दिलेली आहे. या जामीन अर्जाचे काम तकारदार यांचेकडून मुख्य सरकारी जिल्हा वकील अॅड.उज्वला पवार, अॅड. अमृता गुरव, अॅड. परूळेकर अॅड. प्रनीत नामदे, अॅड. अजित पवार यांनी पाहिले. त्यानुसार खोटी कागदपत्रे तयार करून फसवुणुक केल्याचा, आमचा विश्वासघात, तसेच सरकारी जमीनीतून आर्थिक लाभ घेवून गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या बी. कै. जैन याला अटक करावी. त्याच्यापासून आमच्या जिविताला धोका असल्याचेही तक्रारदार प्रकाश करतार बिजलानी व महेश करतार बिजलानी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे.
भ्रष्टाचार निर्मूल समितीकडून कार्यवाहीची मागणी
बांधकाम व्यावसायिक बी. के. जैन याच्यासह सहा जणांविरुध्द  दाखल असलेल्या या जमीन व्यवहार प्रकरणात भष्टाचार निर्मूल समितीने देखील कारवाईची मागणी केली. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत उदगुडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील पत्र पाठवून या प्रकरणाची माहिती दिली. तसेच, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, योग्य कारवाई होणार नाही, असे आढळून आल्यास मुंबईत आझाद मैदानावर अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.