नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दरानं जळगावमध्ये आज ऐतिहासिक उच्चांक गाठला. जळगावमध्ये सोन्याच्या किंमती तोळ्या मागे ४३ हजार १५० रुपयांवर पोहोचला.
जानेवारीपासून सोनं तब्बल सव्वा दोन हजार रुपयांनी महाग झालं आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या सोन्याच्या किंमती कमकुवत झालेला रुपया यामुळे सोन्याच्या किंमतींनी उच्चांकी पातळी गाठली आहे.
चांदीच्या किंमतीही गेल्या आठवडाभरात दीड हजार रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे चांदीच्या किंमती जळगावच्या बाजारात किलोमागे ४७ हजार ७१० रुपयांवर पोहोचल्या आहेत.