नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी काल विक्रमी विजेची मागणी नोंदवली. बुधवारी महावितरणकडे तब्बल २१ हजार ५७० मेगावॅटवीजेची मागणी झाली. ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे. यापूर्वी २३ ऑक्टोबर २०१८ ला २० हजार ७४५ मेगावॅट विजेची विक्रमी मागणी नोंदवण्यात आली होती.

त्या तुलनेत काल झालेली मागणी सव्वा आठशे मेगावॅटने अधिक होती. हवामानातले बदल आणि कृषी पंपांसाठी वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे ही वाढ झाली आहे. अतिरीक्त विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने इंडियन एनर्जी एक्स्चेंजमधून ५७५ मेगावॅट विजेची खरेदी केली.