नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विश्वविजेतेपदाला सहा वेळा गवसणी घालणारी मुष्टियोद्धा मेरी कोम आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला अमित पांघल याच्यासह तीन भारतीय मुष्टियोध्यांनी ऑलिंपिकमधला आपला सहभाग निश्चित केला आहे.
काल अम्मान इथं आशियाई पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांनी प्रवेश केला.