नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने रोम, मिलान आणि सेऊलला जाणारी आपली विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे. रोमला जाणारी विमान सेवा १२ मार्चपर्यंत रद्द केली आहे, तर मिलान आणि सेऊल जाणारी विमानं सेवा १४ मार्च ते २८ मार्चपर्यंत बंद राहील, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
दरम्यान, काल एअर इंडियाच्या विमानाने मिलान इथून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरु आहेत. विमानातले कर्मचारी आणि पायलट यांनाही १४ दिवासांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे.