नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंत्रिमंडळात २८ नवीन मंत्र्यांचा समावेश केला असून त्यातले २० कॅबिनेट दर्जाचे, तर ८ राज्यमंत्री आहेत.
राज्याच्या राज्यपाल आँनदीबेन पटेल यांनी या मंत्र्यांना भोपाळ इथं राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचं नेते ज्योतिरादित्य सिंदिया, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, तसंच इतर नेते उपस्थित होते.