Dharamshala: A view of HPCA Stadium ahead of the first ODI cricket match between India and South Africa, in Dharamshala, Thursday, March 12, 2020. The toss has been delayed due to rains at the venue. (PTI Photo/Atul Yadav) (PTI12-03-2020_000031B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पावसामुळे रद्द झाला.

हिमाचल प्रदेशात धर्मशाळा इथल्या मैदानात दुपारी दीड वाजता सामना सुरु होणार होता. मात्र पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही.

त्यामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. आता मालिकेतला दुसरा सामना १५ मार्चला लखनौ इथं होणार आहे.