पुणे : सामाजिक न्याय विभागांतर्गत मागसवर्गी गुणवंत मुलांचे शासकी वसतिगृह नवीन येरवडा पुणे येथे कनिष्ठ विद्यालयात प्रवेश घेतलेल्या इयत्ता १० वी ६० टक्के गुणादच्या वरील अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. तरी इच्छुक विदयार्थ्यांनी प्रवेशासाठी वसतिगृहात येऊन अर्ज घेवून जावे.
वसतिगृहात प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार राहील. शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास, भोजन, पुस्तके व स्टेशनरी इत्यादी करीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात, असे वसतिगृह अधिक्षक रमेश कोरे यांनी प्रसिध्दीत्रकान्वये कळविले आहे.