नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात भीती बाळगू नये असं आवाहन करत या कायद्याला विरोध नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यांनतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. एनआरसी आणि एनपीआर बद्दलही त्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली.

एनपीआर मध्ये काही आक्षेपार्ह आढळलं तर विरोध केला जाईल असं ते म्हणाले. या तिन्ही गोष्टींबाबत जे वातावरण निर्माण केलं जात आहे ते मुस्लिम समाजासाठी धोकादायक आहे याचा संबंधित नेत्यांनी विचार करावा असं ते म्हणाले.

प्रधानमंत्र्यासोबत राज्याच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, राजकीय गोष्टी बाजूला ठेऊन राज्याला सहकार्य करण्याचं आशावासानं नरेंद्र मोदी यांनी या भेटीत दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.