नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या उत्खननादरम्यान ३ हजार टनांहून अधिक सोन्याच्या साठ्याचा शोध लागला आहे.

सोनभद्र जिल्ह्यातल्या सोन पहाडी आणि हरदी या परिसरात हा साठा सापडला. साधारण दोन दशकांपूर्वी १९९२-९३ सालापासून या साठ्याच्या शोधासाठी उत्खननाचं काम सुरु झालं होतं.