नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही लवकरच सुरक्षित होणार आहे. हे खाद्यपदार्थ कधी तयार केले आणि ते कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहेत अशी पाटी लावणे विक्रेत्यांना जूनपासून बंधनकारक होणार आहे. ही तारीख ठरविण्याचे अधिकार खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांना देण्यात आले आहेत.

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण अर्थात FSSAI नं यासाठीचे निर्देश दिले आहेत. १ जून २०२० पासून याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या डबाबंद केलेल्या खाद्यपदार्थ आणि मिठाईवर उत्पादनाची तारिख आणि हे पदार्थ कधीपर्यंत वापरता येतील याची तारीख असणे बंधनकारक आहे.