नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ नं देता ही योजना बंद करण्यात आली आहे का असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारनं ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट केलं.
या अभियानाची मुदत संपल्यानंतर जी कामं अपूर्ण होती ती कामं ३१ मार्च पर्यंत पूर्ण केली जातील, नव्यानं कोणतंही काम हाती घेतलं जाणार नाही. जलयुक्त शिवार योजनेचं नाव बदलून या योजनेची कामं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनानं दिलेले नाहीत असं गडाख यांनी स्पष्ट केलं.