नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातल्या पाच न्यायमूर्तींना एच1एन1 या विषाणूमुळे होणाऱ्या स्वाईन फ्लू या तापाची लागण झाली आहे. या संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी घ्यायच्या खालील खबरदारीच्या उपाययोजना आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने त्वरित घेतल्या आहेत.
- सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात प्रथमोपचारांची ताकद वाढवली आहे.
- सर्व न्यायमूर्तींना तसेच त्यांच्या कुटुंबियांना रोगप्रतिबंधक उपचार दिले आहेत.
- सर्व न्यायमूर्तींना त्यांच्या घरात अलग करून ठेवले होते यापैकी तीन न्यायमूर्तींची प्रकृती बरी होऊन ते कामावर हजर झाले असून दुसऱ्या दोघांची प्रकृती सुधारत आहे.
- न्यायालयातल्या खोल्या आणि घरे यांची स्वच्छता आणि सफाई वाढवली आहे.
- या रोगाबद्दलची आणि त्याविरुद्ध प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देणे.
एच1एन1 या विषाणूचा प्रसार दरवर्षी हंगामात दोनदा होतो. (जानेवारी ते मार्च आणि जुलै ते सप्टेंबर) त्यामुळे त्याविरुद्ध खबरदारीच्या उपाययोजना प्रत्येकाने घ्यायला हव्यात. खोकताना वा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. खाण्याआधी हात साबण आणि पाण्याने धुवावेत. संसर्ग झालेल्यांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. जर आपल्याला सर्दी झाली असेल तर सतत डोळ्यांना, नाकाला तसेच चेहऱ्याला स्पर्श करू नये. भरपूर पाणी प्यावे, शांत झोप घ्यावी तसेच सार्वजनिक आरोग्य केंद्रावर जाऊन त्वरित उपचार करावेत.