नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा इथं सुरु असलेल्या विद्यापीठ स्तरावरील खेलो इंडिया स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या ज्योती आणि आरती या जुळ्या बहिणींनी जलतरण स्पर्धेत काल चार पदकं जिंकली.
ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ज्योतीनं सुवर्ण आणि आरतीनं कांस्य पदकं जिंकली. रिले प्रकारात मुंबई विद्यापीठाला कांस्य पदक मिळवून देण्यात त्यांनी मोठा हातभार लावला. चौथ्या दिवशी सहा सुवर्ण पादकांसह ११ पदकं जिंकून गुरुनानकदेव पहिल्या स्थानावर होतं.
पंजाब आणि चंदीगड विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर, तर कोलकाता विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर होतं.