नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यावर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधल्या औली इथं २ आठवड्यांचा संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. उभय देशांमधली संयुक्त सरावाची ही १८ वी फेरी आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेत अलास्का इथं गेल्या वर्षी सरावाची १७ वी फेरी झाली होती.
भारत आणि अमेरिका यांच्यातले संरक्षण विषयक संबंध हे गेल्या काही वर्षात अधिक दृढ झाले असून, दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा यासंबंधी अनेक महत्वाचे करार झाले आहेत.