नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानने टोकीयोसह देशातल्या ७ प्रदेशांमध्ये एका महिन्याची आणिबाणी जाहीर केली आहे. या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. प्रधानमंत्री शिंजो आबे यांनी ही घोषणा केली आहे.
आजपासून मे महिन्याच्या ६ तारखेपर्यंत आणिबाणी लागू असेल. याअंतर्गत लोकांना घरीच राहण्याची विनंती करण्यात आली असून यासंदर्भातले आदेश देण्यात आलेले नाहीत.