नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं एक विमान आज चीनमधल्या कोरोनाग्रस्त वुहान शहरात वैद्यकीय आणि मदत सामग्री घेऊन जाणार आहे. हे विमान काही भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे. ते उद्या भारतात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे.

याआधी हे विमान २० फेब्रुवारीला जाणार होतं मात्र चीनकडून त्याला मंजुरी मिळालेली नव्हती. या विमानातून हातमोजे, सर्जीकल मास्क, अन्नपदार्थ आदी वस्तू पाठवल्या जाणार आहेत.