नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठी, केंद्रीय कायदे सामायिक सूचीत घ्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या मत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.
जम्मू-कश्मीर मान्यता कायदा -2019 च्या कलम 96 अंतर्गत जम्मू-कश्मीरमधे केंद्रीय कायदे लागू करण्याचा आदेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.
सरोगसी विधेयकासंदर्भात प्रवर समितीनं केलेल्या शिफारशीही मंत्रिमंडळानं स्वीकारल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. राष्ट्रीय वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आयोग स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यासाठी १ हजार ४८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.