नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुसर कसोटी सामना आज हॅगल ओव्हल इथं सुरू झाला आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडनं आपल्या संघात बदल केला आहे.

एजाझ पटेलच्या ऐवजी नील वाग्नेर याला संधी देण्यात आली आहे. भारतानं आर. अश्विन ऐवजी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 बाद धावा 148 झाल्या होत्या.

भारताचा पहिला डाव २४२ धावांत बाद झाला आहे. यात हनुमा विहारीनं पंचावन्न तर पृथ्वी शॉ आणि चेतेश्र्वर पुजारा यांनी प्रत्येकी चोपन्न धावा केल्या तर काईल जेमीसननं पाच गडी बाद केले. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक – शून्यनं आघाडीवर आहे.