नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालीबानदरम्यान होणा-या शांतताकराराला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी काल काबूल इथं जाऊन अफगाणिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांना दिली.
ते काल अध्यक्ष अश्रफ घनी यांना भेटले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना सुर्पूद केलं. क्षेत्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी, लोकशाही टिकावी, भरभराट व्हावी म्हणून भारत सदैव अफगाणिस्तानच्या पाठिशी उभा असेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
उद्या तालिबान आणि अमेरिका यांच्यात दोह इथं शांतता करार होणार आहे. या करारनुसार अमेरिका आपल्या फौजा माघारी बोलवणार आहे.