नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका दिवसाच्या कोलकत्ता भेटीवर जाणार आहेत. या भेटीत ते कोलकत्ता इथं राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसाठीच्या नव्या संकुलाचं उद्घाटन करतील.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे जवान तसंच अधिकाऱ्यांसाठी नेमबाजीच्या सरावासासह इतर प्रशिक्षणाची व्यवस्था आणि निवासाची सोय या संकुलात असणार आहे. शहा यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कोलकत्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे