नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु होत आहे. हे सत्र ३ एप्रिलपर्यंत सुरु राहील.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केल्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली होती, तर १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर संसदेच्या स्थायी समितीला अर्थसंकल्पीय मागण्यांचा आढावा घेता यावा यासाठी ११ फेब्रुवारीपासून अधिवेशनादरम्यान काही दिवसांची सुट्टी घेण्यात आली होती.
या सत्रात विविध मंत्रालयांच्या मागण्यांना मान्यता देण्यावर चर्चा केली जाईल. याशिवाय वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक, प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास विधेयक, विमान सुधारणा विधेयक, केंद्रीय संस्कृत विद्याविठ विधेयक, तसंच राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयक संसदेत चर्चा आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे.