नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताशी पूर्वापार मैत्रीसंबंध असलेल्या देशांमधे गव्हाची निकड असल्यास त्यांना गहू निर्यात करण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत ते बोलत होते. गव्हाचं उत्पादन यंदा ७ ते ८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे मात्र वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटांचा विपरीत परिणामही होऊ शकतो. प्राप्त परिस्थितीत देशांतर्गत गरज भागवण्याइतकं गव्हाचं उत्पादन होत आहे. भारतानं गहू निर्यात करायला दोन वर्षांपासूनच सुरुवात केली असून गेल्या वर्षभरात सात लाख मेट्रीक टन गहू निर्यात केला. यातला बहुतांश गहू रशिया युक्रेन युद्धाच्या काळात निर्यात झाला आहे.