नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 78 कोटी 58 लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रा पुरवण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांमध्ये 5 कोटी 16 लाखांहून अधिक न वापरलेल्या लसीच्या मात्रा शिल्लक असून 1 कोटी 16 लाखांहून अधिक मात्रा तयार होण्याच्या मार्गावर असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.