नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिजबूल कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले असून, घटनास्थळावरुन शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

हिबूल कमांडर हम्माद खानचा त्याच्या दोन साथादारांसह खात्मा होणं हे दहशतवादा विरुद्धच्या लढाईतील मोठं यश आहे, असं काश्मिरचे पोलीस महानिर्देशक विजयकुमार यांनी काल वार्ताहरांना सांगितलं.