नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मिर खोरं आणि जम्मूच्या पर्वतीय क्षेत्रात ताज्या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. श्रीनगर विमानतळावरही विमान सेवाही यामुळे प्रभावित झाली आहे. जवाहर बोगद्याजवळ काल रात्री जोरदार हिमवृष्टी झाल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

जम्मू राष्ट्रीय क्षेत्राचे वरीष्ठ पोलीस अधिक्षक जे एस जोहर यांनी ही माहिती दिली. पुढल्या चोवीस तासात काश्मिर खो-यात अनेक ठिकाणी हिमवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.