नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यातील ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद आजपासून अबुधाबी इथं सुरु होत आहे. १७० देशांमधले साडेतेहतीस हजार प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत ८०० विशेष प्रदर्शक सहभागी होणार आहेत.

यंदाची संकल्पना – ऊर्जेचा जागतिक वापर, उत्पादन आणि गुंतवणूक याबाबत पुनर्विचार अशी आहे. या परिषदेत ऊर्जा, अन्न, कृषी आणि अंतराळातील शाश्वतता याच्याशी संबंधित ४२ सर्वोत्तम संशोधन सादर केली जाणार आहेत.