नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आलं असून, ऋषभ पंत हा एकमेव यष्टीरक्षक संघात आहे. विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करेल.
२४ जानेवारीपासून टी-ट्वेंट मालिकेला सुरुवात होईल. न्यूझीलंडविरुद्ध भारत तीन एकदिवसीय, तर दोन कसोटी सामनेही खेळणार आहेत. जसप्रीत बुमराह आणि शिखन धवन यांनाही संघात कायम ठेवण्यात आलं आहे. ते न्यूझीलंडच्या ‘अ’ संघाविरुद्ध ५० षटकांचे दोन सराव सामने, तीन ‘अ’ गटातले सामने आणि चार दिवसांचे दोन कसोटी सामने खेळणार आहेत.
न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी भारत मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार असून, पहिला सामना उद्या होणार आहे.