नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉर्डनच्या अम्मान इथं सुरू असलेल्या ऑलिंपिकच्या आशियाई पात्रता फेरीत आज भारताच्या विकास कृष्णन याने ६९ किलोग्राम वजनी गटात, तर सिमरनजीत कौर हिने ६० किलो वजनी गटातल्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
या बरोबरच मेरी कोम, अमीत पंघाल, लवलीना बोरगोहन, पुजा रानी, आशिष कुमार आणि सतीश कुमार यांना आपापल्या वजनी गटात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. या आठही मुष्ठीयोद्ध्यांनी ऑलिंपिक साठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
कृष्णन याचा सामना जॉर्डनच्या ऐशात हूसेन याच्या बरोबर, तर सिमरनजीत कौर हिचा सामना दक्षिण कोरियाच्या ओह-ये-ओन-जी हिच्या बरोबर होणार आहे.