नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तान इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष डॉ अशरफ घनी यांच्या दरम्यान आज दूरध्वनीमार्फत संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी ‘ईद-उल-अदा’च्या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
अफगाणिस्तानची गरज पूर्ण करण्यासाठी भारताच्यावतीने अन्नधान्य आणि वैद्यकीय सामग्री यांचा अतिशय योग्यवेळी पुरवठा केल्याबद्दल अफगाण राष्ट्राध्यक्ष घनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. शांततापूर्ण, समृद्ध आणि सर्वसमावेशक अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी अफगाण लोकांच्या प्रयात्नांप्रती भारत कटिबद्ध असल्याचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुनरूच्चार केला. उभय नेत्यांनी सध्याचे क्षेत्रीय सुरक्षा वातावरण आणि इतर विषयांमध्ये असलेले परस्पर व्दिपक्षीय हितसंबंध यांच्याविषयी विचारांचे आदान-प्रदान केले.