नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडन ब्रिज हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून सुटका झालेल्या दोषी दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दल बारीक लक्ष ठेवत आहे असं ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन  यांनी म्हटलं आहे.

दहशतवादी संघटनांशी संलग्न ७४ आरोपींची  अधिकारी चौकशी करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी तुरुंगातून सुटका झालेल्या उस्मान खान यानं शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले होते.