मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत गंभीर असून, खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करणार आहे, असं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात केलेल्या अभिभाषणात स्पष्ट केलं.

राज्यातल्या जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी योजना राबवली जाईल तसंच प्रत्येक जिल्ह्यात विशेष सोयी–सुविधांनी युक्त रुग्णालयं उभारली जातील, असं आश्वासनही राज्यपालांनी दिलं. दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे.