नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिनिव्हा इथं सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी अधिकार विभागाचं अधिवेशन सुरू असून पाकिस्तानी लष्करानं खैबरपख्तुनख्वा इथं केलेल्या नरसंहारा विरोधात पश्तुन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.

शांततेचं प्रतिक आणि दहशतवादाचा धिक्कार करणारे काळेपांढरे फलक त्यांनी घेतले होते. पश्तुन ओळख आणि संस्कृती वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं ताबडतोब हस्तक्षेप करण्याची मागणी ते करत होते.

पाकिस्तान, पश्तुन नरसंहार थांबवा, पश्तुन राष्ट्राला न्याय हवा, अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या. अलिकडेच, पाकिस्तानी लष्करानं पश्तुन तहफुझ चळवळीचे अर्थात, पीटीएम नेते मंझून पशतीन यांनापश्तुन लोकांचे प्रश्न उपस्थित केल्याबद्दल अटक केली आहे.

जगभरात कार्यकर्त्यांनी व्यापक निदर्शनं केल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं.