नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात ही आग लागली. मृतांमध्ये १८ मुली आणि सुरक्षा कर्मचाऱ्याच्या एका मुलाचा समावेश असल्याचं राष्ट्रीय आग नियंत्रण विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंआहे. या घटनेतील जखमींना महदिया जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.