नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर चालणा-या सोहळ्याचा येत्या १७ तारखेला टाका इथं आयोजित उद्धाटन सोहळा, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलला आहे.
हा सोहळा कधी होणार हे नंतर जाहीर केलं जाणार आहे. बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांच्या निमंत्रणावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढल्या आठवड्यात बांगलादेशाला भेट देणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची औपचारिक अधिसूचना बांगलादेश सरकारनं पाठवली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली आहे.