नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी बँकॉक इथं पोचले. ते तीन दिवसांच्या थायलंड दौ-यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या भेटीदरम्यान १४ व्या पूर्व आशिया परिषद, १६ वी आसिआन भारत परिषद आणि तिस-या प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी परिषदेत सहभागी होतील.

आसियान परिषदेमध्ये भारताचं परराष्ट्र धोरण, पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य ही भूमिका, महत्त्वाचे मुद्दे असतील असं त्यांनी सांगितलं. आसिआन राष्ट्रांशी संबंध वाढवण्यास भारत उत्सुक असून या भेटीदरम्यान विविध राष्ट्रांच्या नेत्यांशी भेटी होवून द्विपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर चर्चा होईल. या परिषदेत भारतातील सेवा, गुंतवणूक, व्यापार आदी मुद्यांवर लक्ष्य केंद्रीत केलं जाईल.

मोदी, बँकॉक इथ नॅशनल इनडोअर स्टेडीअमवर भारतीय समुदायाला संबोधित करतील. गुरु नानक देव यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नाणं जारी करणार आहेत. तिरुकुरुल या तामिळ ग्रंथाचं थायी भाषेतल्या अनुवादाचंही ते प्रकाशन करतील.