नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाची विश्वासार्हता शंकास्पद असून, चीनच्या शेजारी देशांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना, सर्व जगानंच विरोध करण्याची गरज आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माइक पॉम्पीओ यांनी म्हटलं आहे.
भुतानबरोबरचा सीमावाद चीननं जागतिक पटलावर मांडल्यानंतर, पॉम्पीओ यांनी हे मत व्यक्त केलं आहे. पूर्व भूतान मधलं साकतेंग अभयारण्य आपलाच भूभाग असल्याचं, चीन देशानं म्हणायला सुरवात केली आहे.