नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड अरब अमिरातीनं कोविड 19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्याचं जाहीर केलं आहे. अधिकाधिक चाचण्या करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याचं उद्दिष्ट असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं केलेल्या या चांचण्यांमध्ये 445 नवे कोरोना बाधित आढळले असून, इथली कोरोनाबाधितांची एकंदर संख्या 53 हजार 45 वर पोहोचली आहे.