नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य पूर्व अर्थात आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा बसत आहेत. ज्याचा, तिथले नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम होण्याचा धोका संभवतो असं एका नवीन हवामान अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

या अभ्यासानुसार, खनिज तेलाने समृद्ध असलेले आखाती देश, गेले काही वर्षे युरोपियन समुदायापेक्षाहून अधिक हरितगृह वायू उत्सर्जनात जगातील प्रमुख स्त्रोत होण्याच्या मार्गावर आहेत. या अभ्यासात ग्रीस आणि ईजिप्त पासून, लेबेनॉन, सिरीया, इराक, बहारीन, कुवेत, संयुक्त अरब अमीराती तसंच इराणच्या प्रदेशाचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरीस ईजिप्त मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदला संदर्भातील 27 व्या परीषदेचं आयोजन करण्यात येणार आहे.