नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडचा ओमायक्रॉन प्रकार युरोपमधून लवकरच संपुष्टात येईल, असं जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधले संचालक हान्स क्लूज यांनी म्हटलं आहे. सध्या संपूर्ण युरोपमध्ये असलेली ओमायक्रॉनची लाट ओसरली की काही कालावधीसाठी जागतिक पातळीवर रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अँथनी फॉसी यांनी देखील अशीच शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेत बऱ्याच भागात कोविड १९ ची रुग्णसंख्या कमी होत असली तरी गाफील राहू नये असा इशारा त्यांनी दिला आहे.
ओमायक्रॉनमुळे आलेल्या चौथ्या लाटेनं उच्चांक गाठल्यानंतर प्रथमच आफ्रिकेतला मृत्यूदर कमी होत आहे, असं डब्ल्यूएचओच्या आफ्रिकेतल्या प्रादेशिक कार्यालयानं सांगितलं आहे.