नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आजही सुरूच राहिली. सेन्सेक्स आज १ हजार ५४५ अंकांनी कोसळून ५७ हजार ४९२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ४६८ अंकांनी कोसळून १७ हजार १४९ अंकांवर बंद झाला.

सत्रादरम्यान सेन्सेक्स ५७ हजार, तर निफ्टी १७ हजारांच्या खाली गेला होता.  मात्र अखेरच्या तासाभरात बाजार सावरला आणि घसरण थोडी कमी झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून सातत्यानं सुरू असलेल्या विक्रीमुळं बाजारात ही घसरण दिसून येते आहे. गेल्या आठवडाभरात सेन्सेक्स ३ हजार ८०० हून अधिक तर निफ्टी १ हजार १६० अंकांनी घसरला आहे.