नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कांदानिर्यात बंदी उठविल्याची घोषणा ट्विटरवरून केली. परंतु, त्यासंबंधीचा प्रत्यक्ष शासनादेश काढला नाही. अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय ट्विट करून सांगायला शासनादेश म्हणजे ‘मन की बात आहे का?’ असा सवाल महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे सांगलीतील इस्लामपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कालिका देवी मंदिर संस्थांनच्या विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारसह आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांवर टिका केली.