नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत असून झपाट्यानं पुढे येत असलेल्या भारताचं चित्रं यातून स्पष्ट होतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीगडमधे बिलासपूर इथं गुरु घासीदास विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
यावेळी नऊ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी सुवर्णपदकं प्रदान केली. विद्यापीठ परिसरात नव्यानं बांधलेल्या पाच इमारतींचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं.