नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के झाले आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या ७९ लाख ९० हजार ३२२ झाली असून, यापैकी ७२ लाख ५९ हजार ५०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे संसर्गमुक्तीचा दर ९० पूर्णांक ८५ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे.

सध्या देशात या संसर्गाचे ६ लाख १० हजार ८०३ सक्रीय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख २० हजार १० एवढी झाली आहे. या संसर्गाचा मृत्यूदर दीड टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काल दिवसभरात एकूण १० लाख ६६ हजार ७८६ नमुन्यांची कोविड तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण दहा कोटी ५४ लाख ८७ हजार ६८० कोविड चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.