मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८३६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यावर पोचले आहे.

काल दिवसभरात आणखी ५ हजार ३३६ कोरोना बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ५४ हजार २८ झाली आहे. राज्यभरात काल ११५ रुग्णांचा मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक लाख ३१ हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठाणे जिल्ह्यात काल ६९३ नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या २ लाख ८ हजार २८५ झाली आहे. आतापर्यंत ५ हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली भागात १३० रुग्णांची वाढ झाली. उल्हासनगरमधील रुग्णसंख्या १० हजार १४१ झाली आहे, तर मीरा-भाईंदर क्षेत्रात १२९ रुग्णांची भर पडली आहे.

नाशिक जिल्ह्यात काल ३८६ रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यातले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यावर गेले आहे. काल १७१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात काल १२ रुग्णांनी आपला प्राण गमावला.

बुलडाणा जिल्ह्यात काल ४९, तर आतापर्यंत ८ हजार ४१८ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे काल नवे ९८ रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांचा आकडा ९ हजार १५३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १२१ रुग्णांचा या आजारामुळे बळी गेला आहे. सध्या ६१४ रुग्ण उपचार घेत आहेत.

जालना जिल्ह्यात काल १४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ११७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत काल ३४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या १० हजार ४७६. आतापर्यंत २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या १ हजार ८६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात काल २९५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. जिल्ह्यात या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ५२ हजार ९४५ वर पोचली आहे. काल २२१ रूग्णांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५ हजार ३५० झाली आहे. आतापर्यंत ८४८ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. सध्या १ हजार ५५७ रुग्ण उपचार घेत आहेत.

रायगड जिल्हय़ात काल १७० तर आतापर्यंत ५० हजार ३५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत काल १२६ नवीन रुग्ण आढळले त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ४४१ झाली आहे काल ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

परभणी जिल्ह्यात काल ३० रुग्ण या आजारातून बरे झाले त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६ हजार चार झाली आहे. काल १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ६ हजार ४४५ झाली आहे. आतापर्यंत २६२ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. सध्या १७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काल १९ तर आतापर्यंत सात हजार ७५१ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे काल २२ नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे रुग्ण संख्या वाढून आठ हजार ४०५ झाली आहे. आतापर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या २३२ रुग्ण उपचाराधीन आहेत.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल जिल्ह्यात ९६ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णांची एकुण संख्या ४० हजार ३५३ वर पोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२२ इतक्या रुग्नांचा मृत्यु झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ६६४ झाली आहे. यापैकी ३५ हजार ६२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्यात १ हजार ६३ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.