नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही दोषींची फाशी, दिल्लीतल्या न्यायालयानं पुढच्या आदेशापर्यंत पुढे ढकलली आहे. चौघांची फाशी उद्या सकाळी सहा वाजता नियोजित होती.
मात्र दोषी पवनकुमार गुप्ताची दयायाचिका प्रलंबित असल्यानं फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकणार नाही, असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी सांगितलं. पवनकुमारंन आज राष्ट्रपतींकडे दयायाचिका केल्यानं, फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या त्याच्या याचिकेवर न्यायालयानं हे आदेश दिले.