नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असं अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितलं. इटानगर इथं वार्ताहरांशी ते बोलत होते. पारदर्षक अरूणाचलच्या दिशेनं युवकांना नेण्यासाठी कर्मचारी निवड मंडळ हा राज्य सरकारसाठी खास प्रकल्प आहे.
अरूणाचल प्रदेश कर्मचारी निवड मंडळानं घेतलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवर विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं. या कथित गैरव्यवहार प्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे असं खांडू म्हणाले.
मंडळाचे माजी सचिवांना निलंबित केल्याचंही त्यांनी सांगितलं. २१ दिवसांच्या आत समिती सरकारला अहवाल देईल अशी माहितीही त्यांनी दिली.