नवी दिल्ली : देशातली पहिली नौदल हवाई स्क्वाड्रन 550 चा हीरक महोत्सव 17 ते 19 जून 2019 दरम्यान कोचीच्या नौदल तळावर साजरा होत आहे. या सेवेला 60 वर्ष पूर्ण झाली असून नौदलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नौदलाला पाठबळ देण्यासाठी ही हवाई सेवा असते.
हीरक महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ज्यात अवयव दान जागृतीविषयक व्याख्यान तसेच हीरक महोत्सवी अंक देखील काढण्यात आला. त्याशिवाय या स्क्वाड्रनच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा आणि सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. या स्क्वाड्रनने आपल्या 60 वर्षांच्या कार्यकाळात 14 विविध प्रकारची लढाऊ विमाने हाताळली आहेत. 1970 च्या भारत-पाकिस्तान युद्धात तसेच आपत्ती निवारण अभियानांमध्ये काम केले आहे.